Rahul Kalate : असं कसं झालं? ४४ हजार मतं घेऊनही राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त

jalgaon-digital
2 Min Read

पुणे | Pune

पुणे पोटनिवडणुकीच्या निकालांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. चिंचवडची जागा पुन्हा ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न फसले.

बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी खेचलेल्या ४४ हजारांहून अधिक मतांमुळं राष्ट्रवादीला ही जागा गमवावी लागल्याचं दिसत आहे. मात्र, इतकी मतं खेचूनही कलाटे यांना स्वत:चं डिपॉझिट वाचवता आलं नसल्याचं समोर आलं आहे.

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

आघाडीचे नाना काटे वगळता कलाटेंसह चिंचवड मतदारसंघातील इतर सर्व २६ उमेदवारांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉजिट जप्त झाले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या चिंचवड मतदारसंघात ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ८७ हजार १४५ जणांनी मतदान केले. त्याच्या एक षष्टांश म्हणजे १६.६ टक्के मते (४७ हजार ६६६)अनामत शाबूत राहण्यासाठी मिळणे गरजेचे होते.

IND vs AUS 3rd Test : इंदोर कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये

हा कोटा फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे यांनी पूर्ण केला.त्यांना ९९,३४३ मते पडली. तर,कलाटेंसह बाकीच्या सर्व २६ उमेदवारांना हा कोटा पूर्ण करता आला नाही. कलाटेंना ४४,०८२ मते मिळाली. त्यामुळे विधानसभेला सलग तीनदा पराभवाची हॅटट्रिक चाखलेल्या कलाटेंवर यावेळी डिपॉजिटही गमावण्याची पाळी आली.

भाजप आमदाराच्या पुत्राला ४० लाखांची लाच घेताना पकडलं; घरात सापडलं ६ कोटींचं घबाड

कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काटे यांचा प्रचार केला असता तर काटे विजयी झाले असते. मात्र, त्यांनी निवडणूक लढवल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कलाटे अपक्ष म्हणून लढत असले तरी त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कलाटे यांचा प्रचारही केला होता. त्यामुळे दलित समाजातील मते कलाटे यांच्याकडे वळल्याचं सांगितलं जात आहे.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची चौकशी करा; मनसेच्या नेत्याच्या मागणीने खळबळ

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *