Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागणेश विसर्जनासाठी नाशकात असेल असा पोलिसांचा बंदोबस्त...

गणेश विसर्जनासाठी नाशकात असेल असा पोलिसांचा बंदोबस्त…

नाशिक| प्रतिनिधी Nashik

अनंत चतुर्दशीला विघ्नहर्त्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरात नदीकाठी कुंड तयार करण्यात आलेली आहे. त्यासाठी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त (Deployment of the police for ganesh idol immersion) देखील शहरात लावण्यात आला आहे. यात शहर पोलीस आयुक्तालयातर्फे हजारो पोलिसांचा ताफा नेमण्यात आला…. (Nashik City Police)

- Advertisement -

शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik police commissioner Deepak Pandey) यांच्या नेतृत्वाखाली १२९ पोलीस अधिकाऱ्यांसह २ हजार पोलिसांचा ताफा शहरात सज्ज असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ३ पोलीस उपायुक्त , ६ सहायक पोलीस आयुक्त, २७ पोलीस निरीक्षक, ९३ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांची तुकडी तैनात असणार आहे. पोलिसांच्या मदतीला राज्य राखील पोलीस दल, त्वरित प्रतिसाद पथक, ४५० होमगार्डची तुकडी असणार आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून करोना विषाणूच्या (covid 19) पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या वर्षीदेखील करोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करत गणेशोत्सव सध्या पद्धतीने करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीला वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्याची प्रथा यावेळी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे फक्त नदीकाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या