साहेब, आम्ही आपल्या सोबतच

दे. कॅम्प शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन
साहेब, आम्ही आपल्या सोबतच

सातपूर । प्रतिनिधी Satpur

साहेब, तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही शिवसैनिक ( Shivsainiks )तुमच्या सोबत आहोत, असे भावनिक आवाहन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray)यांची देवळाली कॅम्प ( Deolali Camp )शहरातील व संसरी गावातील काही शिवसेना, युवासेना पदाधिकारी यांनी मातोश्रीवर भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शहरातील शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्यंने उपस्थित होते.

शिवसेना नेते आणि मंञी एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले असून शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र सध्या दिसत आहेत. त्यातच येथील स्थानिक भूमिपुत्र खा. हेमंत गोडसे हे देखील शिंदे गटात सामील झाले. याच पार्श्वभूमीवर येथील शहरातील शिवसैनिक व पदाधिकारी यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख प्रमुखांची (दि.22) शुक्रवारी भेट देऊन आम्ही आपल्या सोबत असल्याचे पक्षप्रमुख ठाकरे यांना सांगितले.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले की, तुमचे असेच प्रेम राहून द्या. येणार्‍या संकटाला तोंड देण्यांची हिंमत फक्त शिवसेनेत आहे. तुमचे प्रेम संकटकाळात मिळालेली साथ पाहून समाधान वाटत आहेत. तर उपस्थित शिवसैनिकांनी आपल्या सोबत आहोत, असा निर्धार केला. यावेळी शहर शिवसेनेचे प्रमोद मोजाड यांनी सांगितले की, येथील शिवसैनिक पदाधिकारी, शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे.

यावेळी ज्येेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब गोडसे, माजी शहरप्रमुख पोपटराव जाधव, शिवसेना तालुका संघटक चंद्रकांत गोडसे, युवासेना शहरप्रमुख प्रमोद मोजाड, विलास गिते, उपशहरप्रमुख वैभव पाळदे, रोहित कासार, नितीन गायकवाड, रोहित गोडसे, प्रशांत कोकणे, गोकुळ मोजाड आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

बंडखोर खा. हेमंत गोडसे हे नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन करत असतांनाच त्यांच्याच गावातील व शहरातील शिवसैनिक व पदाधिकारी यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही आपल्याच सोबत असल्याचे सांगितले. याचीच दिवसभर माध्यमातून चर्चा सुरू होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com