Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशDeoghar Ropeway Accident : देवघर रोपवे दुर्घटनेतील मृतांची संख्या ३ वर, बचावकार्य...

Deoghar Ropeway Accident : देवघर रोपवे दुर्घटनेतील मृतांची संख्या ३ वर, बचावकार्य सुरुच

दिल्ली | Delhi

झारखंडच्या (Jharkhand) देवघर (Deoghar) जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकुट टेकडीवर रविवारी रोपवेवरचे दोन डबे एकमेकांवर आदळल्याने गंभीर अपघात झाला. (Deoghar Ropeway Accident)

- Advertisement -

या अपघातानंतर (Jharkhand Ropeway Accident) तब्बल ४० तास उलटूनही बचावकार्य पूर्ण होऊ शकलं नाही. या अपघातात आत्तापर्यंत एकून तीन जणांचा मृत्यू झाला असून अजूनही बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान या बचावकार्यादरम्यान एक गंभीर घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमधून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की एक तरुण हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला लटकलेला आहे. बराच वेळ तो याच अवस्थेत तिथेच राहातो. मात्र, अखेर त्याचा हात सुटतो आणि तो थेट खाली कोसळतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या