Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यादंत आरोग्यदिन विशेष : वाईट सवयींमुळे मौखिक कर्करोग

दंत आरोग्यदिन विशेष : वाईट सवयींमुळे मौखिक कर्करोग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दातांच्या आजाराविषयी जनजागृतीच्या Awareness about dental diseases अभावामुळे मौखिक आजाराचे oral diseases व चुकीच्या पद्धतीने दात घासणे, तंबाखू, गुटखा सेवन करणे अशा वाईट सवयींमुळे मौखिक कर्करोगाचे Oral cancer प्रमाण फार वाढले आहे.

- Advertisement -

आज 5 फेब्रुवारी हा दिवस मौखिक आरोग्य दिन Oral Health Day म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दंंत आरोग्याचा आढावा घेेतला असता वरील चित्र दिसत असल्याचे आढळून आले आहे. तोंंडाचे आरोग्य चांगले असेल तर आरोग्याच्या इतर समस्या उद्भवत नाही, अन्नाचा घास व्यवस्थित चावल्यामुळे पचन व्यवस्थित होते. पर्यायाने पोटाचे आरोग्य ही चांगले राहते. दात, हिरड्या, जबडा, तोंडाचा आतील भाग निरोगी असेल तर व्यक्तीचे एकूणच आरोग्य निरोगी राहते.

हिरड्यांचे आजार हे व्यवस्थित ब्रश न केल्याने होतात. गोड पदार्थांचे सेवन केल्यानंतर किमान खळखळून चूळ भरावी, असे सतत सांगतात. परंतु या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने आठ ते दहा टक्के नागरिकांना हिरड्यातून रक्त येणे, पायोरिया, हिरड्या सुजणे असे आजार संभवतात.

लहान मुलांमध्ये विशेषतः चॉकलेट बिस्किटे खालल्यानंतर दात न घासल्याामुळे गोड अन्नपदार्थ दातात अडकून दात किडणे हा आजार वाढला आहे. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने किमान दोन वेळा दात स्वच्छ करणे आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे हे मौखिक आरोग्य जपण्याचे दोन महत्त्वाचे सूत्र आहेत तसेच दातांच्या आजाराविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन रुग्णांनी दातांची नियमित तपासणी केल्यास मौखिक आरोग्य निरोगी राहू शकते तसेच तंबाखूजन्य पदार्थसह सुपारी, पान, मसाला यापासून दूर राहिले पाहिजे.

तोंडाच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जनजागृतीचा अभाव आणि ब्रश करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे मौखिक आरोग्य बिघडत चालले आहे. या पुढे तरी आपले दात शेवटपर्यंत चकचकीत व अबाधीत राहतील, असा संंकल्प या निमित्ताने करु या.

-डॉ. प्रियांका अमोल पुरी- नामपूरकर

-Dr. Priyanka Amol Puri- Nampurkar

- Advertisment -

ताज्या बातम्या