Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशासकीय कार्यालयात परिचय असल्याचे भासवून केली लाचेची मागणी

शासकीय कार्यालयात परिचय असल्याचे भासवून केली लाचेची मागणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

तक्रार दाराच्या तक्रारी नुसार औद्योगिक प्रयोजनार्थ इंडस्ट्रियल शेड बांधकामाची परवानगी मिळवून देण्यासाठी आरोपी खासगी इसम सागर प्रकाश मोरे (28 ) याने शेड बांधकामाची परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

- Advertisement -

यातील आरोपी खाजगी इसम यांनी औद्योगिक प्रयोजनार्थ इंडस्ट्रियल शेड बांधकामाची परवानगी मिळवून देण्यासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय नाशिक येथे त्यांचा परिचय असल्याचा प्रभाव तक्रारदार यांच्यावर पाडून तक्रारदाराकडे (दि.15 सप्टेंबर) यातील संशयित आरोपी खाजगी व्यक्तीने 30 हजार रुपयांची लाचेची मागणी करून (दि.०४ ऑक्टोबर) तिस हजार रुपयांच्या लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल कडासने , अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, सह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे,सापळा पथक हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी,प्रवीण महाजन, संतोष गांगुर्डे यांच्या पथकातर्फे करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या