Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करा

आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करा

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात फक्त तीन दिवस पुरेल इतकाचा कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा आसून राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता वेग पहाता आठवड्याकाठी किमान ४० लाख लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

- Advertisement -

१८ वर्षावरील सर्वांना लसीचा डोस मिळावा असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सध्याची गंभीर परिस्थिती पाहता विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहनही टोपे यांनी केले. निर्बंध लादले आहेत कारण जीव महत्त्वाचा आहे,असेही टोपे म्हणाले.

राज्याला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण केंद्रे बंद पडण्याची भीती आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील लसीकरण, ऑक्सिजनची परिस्थिती तसेच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना या केल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली.

राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दुकाने बंद आहेत हे मान्य. पण जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का यावर मंत्रिमंडळात विचार केला जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या