उद्योग क्षेत्र दहा दिवसांसाठी बंद ठेवा- आ. सीमा हिरे

मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
उद्योग क्षेत्र दहा दिवसांसाठी बंद ठेवा- आ. सीमा हिरे

सातपूर । प्रतिनिधी

करोनाच्या संकटामुळे राज्य दुष्टचक्रात सापडला आहे. या लढाईत कुठे ऑक्सिजन नाही, औषधे नाही, बेड्स नाहीत. त्याअभावी रुग्णाचे हाल व मृत्यू होत आहे. महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दि. 21 एप्रिल रोजी शासनाने परिपत्रक काढून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कलम 144 लागु करुन कडक निर्बध लागू केले आहेत जिल्हातील औद्योगिक क्षेत्रात 10 दिवसाचा तत्काळ पुर्ण लॉकडाऊन लागू करण्याची मागणी आ.सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिक जिल्हात साधारण रोज 5 ते 6 हजार रुग्णांची वाढ होत आहे. त्यात गेल्या महिनाभरात नाशिक जिल्हात 2500 ते 3 हजार नागरीकांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात सुध्दा मृत्युचे तांडव सुरु आहे. व्यवसाय व व्यापार ज्याप्रमाणे पुर्णपणे बंद ठेवले आहेत. त्याच प्रमाणे नाशिक पश्चिममधील औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुध्दा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली आहे.

अनेक कामगारांना या विषाणुचा संसर्ग होवून मृत्यू झाले आहे. कामगारांचे कुटूंब निराधार झाले आहेत. सध्या नाशिकची परिस्थिती बघता संसर्ग झालेल्या कामगारांना हॉस्पिटल मिळत नाही आहेत. तसेच आजारपणासाठी लागणारा लाखोचा खर्च सर्व सामान्य कामगार कस करणार.असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या बाबीं विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी व कामगार व त्यांच्या कुटुंबाचे हित व सुरक्षितता ठेवण्यासाठी कारखाने त्वरीत 10 दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com