Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा बँकेला उर्जितावस्था द्या

जिल्हा बँकेला उर्जितावस्था द्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतकरी आणि ठेवीदार यांना दिलासा देण्यासाठी बँकेला गतवैभव पुन्हा प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे.

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या आक्षेपामुळे अडचणीत आली ते आक्षेप शिथिल करावेत अशी विनंती खा. हेमंत गोडसे यांनी केंंद्रीय सहकार मंत्री ज्ञानेश कुमार यांना केली आहे. शेतकर्‍यांची मागणी न्यायीक असल्याने जिल्हा बँकेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी खा.गोडसे यांनी केंद्रिय स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जिल्हा बँक शेतकर्‍यांसाठी वरदान असून, अनेक कारणांमुळे बँक अडचणीत आल्याने शेतकर्यांना कर्ज पुरवठा गेला जात नाही.या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री ज्ञानेश कुमार यांची दिल्लीत भेट घेत खा.गोडसे यांनी त्यांना वस्तूस्थितीची माहीती दिली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर बोलताना शेतकर्‍यांच्या हितासाठी असलेल्या जिल्हा बँकेच्या विषयीच्या या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ज्ञानेश कुमार यांनी खा. गोडसे यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या