Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे टोलनाका तातडीने रद्द करण्याची मागणी

शिंदे टोलनाका तातडीने रद्द करण्याची मागणी

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिक-सिन्नर महामार्गावरील Nashik – Sinnar Highway शिंदे टोल प्लाझा Shinde Toll Plaza अवघ्या सहा किलोमीटर तर नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीपासून अवघा पाच किलो मीटर अंतरावर आहे. सिन्नरपासून नाशिक शहर अवधे 25 किमी असल्याने नोकरी, शिक्षण आणि हॉस्पिटलायझेशनच्या कामांसाठी सिन्नर येथील शेकडो वाहने रोज शिंदे टोल प्लाझावरून ये-जा करत असतात.

- Advertisement -

इतक्या कमी अंतरासाठी टोल द्यावा लागत असल्याने नाशिक आणि सिन्नर येथील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अशातच प्रशासनाकडून वाहनधारकांना हव्या तशा सोयी सुविधा मिळत नसल्याने प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून शिंदे येथील टोल नाका तातडीने रद्द करावा, अशी आग्रही मागणी खा. हेमंत गोडसे MP Hemant Godse यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari यांच्याकडे केली आहे.

शिंदे टोल प्लाझाच्या 20 किलोमीटर परिघातील वाहन धारकांना 250 रूपयांचा पास सक्तीचा असून या परिघातील शिंदे औद्योगिक वसाहत, ब्राम्हणवाडे, मोहगाव, पळसे, चिंचोले, वडगाव आदी गावांमधील लोकसंख्या सुमारे 15 लाखांच्या घरात आहे. सिन्नर शहरातील शेकडो वाहनधारकांना रोज नोकरी, हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी नाशिक शहरात ये-जा करावी लागते. त्यामुळे 20 ते 25 किमी अंतरासाठी रोजच टोल भरावा लागत असल्याने स्थानिक वाहनधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

याबरोबर नाशिक येथून सिन्नरच्या दिशेने जाण्यासाठी शिंदे टोलपासून पुढे अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर संगमनेर शिवारात पुन्हा दुसरा टोल आहे. यामुळे नाशिककरांना 50 किलोमीटर अंतरावर दोनदा टोल भरावा लागतो. या विषयीच्या अनेक तक्रारी खा. गोडसे यांच्याकडे आल्याने त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली.

संगमनेर जवळील हिवरगाव शिवारातील टोल प्लाझामध्ये शिंदे टोल प्लाझाचे विलणीकरण केल्यास आर्थिक नुकसान होणार नाही. शिवाय घोटी-सिन्नर-शिर्डी-नागपुर (समृध्दी महामार्ग) आणि सुरत-चेन्नई (ग्रीन फिल्ड) आदी रस्तेही याच टोल प्लाझावरून जातात. त्यामुळे शिंदे टोल प्लाझाचे संगमनेर येथे टोल प्लाझात विलणीकरण झाल्यास नाशिक आणि सिन्नर या दोन्ही शहरांमधील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिंदे टोल प्रशासनाच्या मनमानी कारभाराविषयीच्या नाशिक आणि सिन्नर येथील वाहनधारकांकडून आलेल्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असून वेळीच दखल न घेतल्यास कोल्हापूर येथील टोल प्लाझासारखी परिस्थिती उदभवू शकेल, असे स्पष्ट करत खा. गोडसे यांनी शिंदे टोल प्लाझा विषयीचे गांभिर्य गडकरी यांच्या लक्षात आणून दिले. आपली मागणी आणि वाहन धारकांविषयीची तळमळ न्यायिक असल्याने शिंदे टोल प्लाझा रद्द करण्याविषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही गडकरी यांनी खा. गोडसे यांना दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या