
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग आणि मुंबईहून देशभरात जाणार्या 98 रेल्वेगाड्याच्या प्रवासाचा वेळ वाचविण्याकामी कसार्या घाटात अद्यावत बोगदा उभारण्याच्या प्रस्तावास गती मिळावी यासाठी खा.हेमंत गोडसे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
नाशिक-पुणे लोहमार्गासाठी तयार करण्यात आलेल्या डीपीआर मध्ये काही त्रुटी असल्यास त्यावर मार्ग निघेपर्यंत न थांबता रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे तसेच मुंबईहून देशभरात जाणार्या रेल्वेगाडयाच्या प्रवासाचा वेळ वाचविण्याकामी कसार्या घाटात अद्यावत बोगदा उभारण्याच्या प्रस्तावास गती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी खा.गोडसे यांनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
आपली मागणी न्यायिक असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नामदार वैष्णवी यांनी दिली आहे. खा.गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नातून नाशिक-पुणे या प्रस्तावित लोहमार्गाला काही वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळालेली असून यासाठी सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
खा.गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक असणार्या सर्व मान्यता मिळालेल्या आहे.भूसंपादनाचे कामही अंतिम टप्प्यात असून डीपीआरमध्ये काही किरकोळ त्रुटी आहेत. तसेच रोज 98 रेल्वेगाड्या मुंबई येथून देशभरासाठी धावत असतात. घाट परिसरातील बोगदयांमधून जाण्यासाठी रेल्वेगाड्यांंना बॅकर लावावे लागते.त्यामुळे इगतपुरी ते कसारा या दरम्यानचे अंतर कापण्यासाठी सर्वच गाड्यांना उशीर होतो.
रेल्वे गाड्याचा आणि प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी कसार्या घाटात अद्यावत बोगदा उभारण्याचा प्रस्ताव खा. गोडसे यांनी वर्षभरापूर्वी रेल्वे मंत्रालयाला दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज खा. गोडसे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना प्रस्तावित नाशिक - पुणे रेल्वेमार्ग आणि कसार्या घाटात अद्यावत बोगदा लवकर उभारणे कसे आणि किती गरजेचे आहे हे निदर्शनास आणून दिले.
वरील दोनही प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामांना लवकरात लवकर प्रारंभ करावा अशी आग्रही मागणी खा.गोडसे यांनी वैष्णव यांच्याकडे केली. याबरोबरच मुंबईहून देशभरात धावणार्या रेल्वे गाड्यांचा आणि प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी घाट परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत बोगदा तयार करण्याच्या प्रस्तावास गती देणार असल्याचे आश्वासन यावेळी वैष्णव यांनी दिली केले. यावेळी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार उपस्थित होत्या.