सिंहस्थसाठी भूमी अधिग्रहणाकरिता 'इतक्या' कोटींची राज्याकडे मागणी

सिंहस्थसाठी भूमी अधिग्रहणाकरिता 'इतक्या' कोटींची राज्याकडे मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर साधूग्रामसह विविध अधिग्रहणाच्या (Acquisition) कामांसाठी

लागणारा चार हजार पाचशे पंचाण्णव कोटी रुपयांचा निधी (fund) शासनाने उपलब्ध करुन देण्याची मागणी महानगर पालिकेने राज्य शासनाकडे केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्रामसाठी मोठ्या प्रमाणात भूमी अधिग्रहण (Land acquisition) करणे गरजेचे असून,

अंतर्गत रिंगरोडसह विविध विकास कामांंसाठी (development works) भूमीअधिग्रहणाचे सुमारे 171 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यासाठी 4 हजार 599 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. नाशिक महानगरपालिकेला (Nashik Municipal Corporation) एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नसल्याने यासाठी मनपाने राज्य शासनाकडे भूसंपादनासाठीं निधीचा प्रस्ताव पाठवला आहे.

त्या माध्यमातून निधी (fund) उपलब्ध झाल्यात तातडीने कार्यवाही केली जाईल असे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी सांगितले. मनपाच्या क्षमतेवर बोलताना आयुक्तांनी मनपाचा बजेटही तेवढा नसून मनपाच्या माद्यमातून 150 ते 175 कोटी रुपये उभे करणे शक्य होते. मात्र एवढ्या मोठ्या रकमेची तजविज करणे मनपाला अशक्य असल्याने राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनीनमुद केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com