Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशदिल्लीची वाटचाल लॉकडाऊनकडे : आता खासगी कार्यालये, बार बंद

दिल्लीची वाटचाल लॉकडाऊनकडे : आता खासगी कार्यालये, बार बंद

राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे मागील आठवड्यातच शाळा, महाविद्यालये, सलून, चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बस, मेट्रो सुरू असली तरी प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानंतरही कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नसल्याने आता दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये तसेच रेस्टोरेंट व बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Delhi Covid Crisis)

रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

- Advertisement -

कोरोनाची (covid19) वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वीच शनिवारी व रविवारी संचारबंदी जाहीर कऱण्यात आली. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. पण आता ही कार्यालये पूर्णपणे बंद राहतील. सर्वच कर्मचाऱ्यांना घरुन काम करावे लागणार आहे.

श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या