अखेर दिल्लीत विकेंड कर्फ्यू : कठोर निर्बंध केलेत लागू
विकेंड लॉकडाऊन (File Photo)

अखेर दिल्लीत विकेंड कर्फ्यू : कठोर निर्बंध केलेत लागू

नवी दिल्ली :

राजधानी दिल्लीतील कोरोना आणि ओमियक्रॉन (Corona Cases In India) रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीमध्ये विकेंड (Weekend Curfew In Delhi ) कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 24 तासांत राजधानीत 4000 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे देखील कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive)आले आहे.

विकेंड लॉकडाऊन (File Photo)
कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

दिल्लीत आठवड्यापासून वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. दिल्लीत शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू लागू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

50% कर्मचाऱ्यांवर काम

वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच यातून सूट दिली जाणार आहे. तर, खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीदेखील कार्यालयातील संख्या 50% वर आणण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com