क्रूरतेची परिसीमा गाठली! आधी चाकूचे ४० वार, नंतर दगडाने ठेचून १६ वर्षीय प्रेयसीला संपवलं

मन सून्न करणारी घटना
क्रूरतेची परिसीमा गाठली! आधी चाकूचे ४० वार, नंतर दगडाने ठेचून १६ वर्षीय प्रेयसीला संपवलं

दिल्ली | Delhi

भारताची राजधानी दिल्ली (Delhi) हत्येच्या घटनेने हादरली आहे. या घटनेत एका माथेफिरू प्रियकराने (Boyfriend) चाकू आणि दगडाने ठेचून १६ वर्षीय अल्पवयीन प्रियसीची (Girlfriend) हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना एका रस्त्यावर घडली आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्याने संपूर्ण घटनाक्रम घडवून आणला आहे. या घटनाक्रमाने दिल्लीत हळहळ व्यक्त होत आहे.

दिल्लीतील उत्तर जिल्ह्यातील शाहबाद पोलिस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे. तरुणीच्या हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती घेऊन त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेतील आरोपीचे नाव साहिल असे असल्याची ओळख पटली आहे.

क्रूरतेची परिसीमा गाठली! आधी चाकूचे ४० वार, नंतर दगडाने ठेचून १६ वर्षीय प्रेयसीला संपवलं
Fire : पुण्यात IT पार्कमध्ये भीषण आग, अनेक कर्मचारी अडकल्याची भीती

दरम्यान या भयंकर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. साहिल तरुणीवर वारंवार चाकुने वार करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आजूबाजूला लोकंही आहेत. मात्र कोणीही त्याला विरोध करताना दिसत नाहीये. तसंच, तरुणीला वाचवण्यासाठीही कोणी पुढे यात नसल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

तरुणीवर हल्ला करत साहिल घटनास्थळावरुन फरार झाला आहे. जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीचे आणि साहिल यांच्यात प्रेमसंबंध होते.

क्रूरतेची परिसीमा गाठली! आधी चाकूचे ४० वार, नंतर दगडाने ठेचून १६ वर्षीय प्रेयसीला संपवलं
Crime News : दारूच्या नशेत पतीने केलं भयंकर कृत्य, गाढ झोपेत असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या

ही अल्पवयीन मुलगी एका वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना आरोपी साहिल (वय २०) ने तिला रस्त्यात अडवलं आणि तिच्यावर चाकूने २० पेक्षा अधिक वेळा वार केले. यादरम्यान चाकू पीडितेच्या डोक्यात अडकला यानंतर नराधमाने जवळच पडलेला दगड उचलून तिचे डोकं ठेचलं.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com