Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशबापरे! पंचतारांकित हॉटेलमध्ये 'तो' ६०३ दिवस राहिला फुकट; तब्बल 58 लाखांची फसवणूक

बापरे! पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘तो’ ६०३ दिवस राहिला फुकट; तब्बल 58 लाखांची फसवणूक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दिल्लीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक व्यक्ती तब्बल ६०३ दिवस फुकट राहिला आणि बिल न भरताच फरार झाला. अंकुश दत्ता असे त्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाला माहिती मिळताच मोठा गोंधळ उडाला…

- Advertisement -

या व्यक्तीने हॉटेलची तब्बल 58 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. दत्ता याचे हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांशी जुने संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या हॉटेलचे संचालन करणाऱ्या बर्ड एअरपोर्ट हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​विनोद मल्होत्रा ​​यांच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मोठी दुर्घटना! रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; ३१ जणांचा होरपळून मृत्यू

हॉटेलने आरोप केला आहे की, कर्मचारी प्रेम प्रकाश याच्या मदतीने दत्ताने फसवणुकीचा कट रचला. हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, मूळचा गुवाहाटी (आसाम) येथील अंकुश दत्ता याने 30 मे 2019 रोजी हॉटेल रोझेट हाऊस ऑफ एरोसिटीमध्ये चेक इन केले होते. त्याला हॉटेलने खोली क्रमांक 437 दिला होता.

या खोलीचे रोजचे भाडे 6355 रुपये होते. अंकुश दत्ता दुसर्‍या दिवशी म्हणजे 31 मे 2019 रोजी हॉटेलमधून चेकआउट करणार होता, परंतु त्याने चेकआउट केले नाही आणि 22 जानेवारी 2021 पर्यंत आपला मुक्काम वाढवला.

Darshana Pawar : दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; राहुल हांडोरेला मुंबईतून अटक

हॉटेलचा नियम आहे की, जर एखादा पाहुणे 72 तासांपेक्षा जास्त काळ थांबला असेल आणि त्याने थकबाकी भरली नाही, तर त्याची माहिती तातडीने हॉटेल व्यवस्थापन अधिकाऱ्यांना द्यावी लागले. परंतु प्रेम प्रकाशने तसे केले नाही. उलट हॉटेलचे थकीत भाडे द्यावे लागू नये म्हणून प्रेम प्रकाशने हॉटेलच्या सॉफ्टवेअर सिस्टममध्ये हेराफेरी करून अंकुश दत्ताच्या खात्याबाबत चुकीच्या नोंदी केल्या.

पोलीस तक्रारीनुसार, हॉटेल मॅनेजरने प्रेम प्रकाश याच्यावर दत्ताचे खाते योग्य दिसण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रेम प्रकाशने दत्ताची रक्कम दुसऱ्या पाहुण्यांच्या बिलात समायोजित करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच यासाठी बनावट व खोटी बिले तयार केली, असाही आरोप करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

साताऱ्यात राडा; उदयनराजे, शिवेंद्रराजेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या