दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालय ईडीकडून सील

दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालय ईडीकडून सील

नवी दिल्ली । New Delhi

अंमलबजावणी संचालनालयने (ED) कथित नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी (National Herald Financial Misappropriation Case) नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला टाळे ठोकले असून परवानगीशिवाय हा परिसरात खुला करु नये असे निर्देश ईडीने दिले आहेत...

काल ईडीच्या एका पथकाने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा (Raid) टाकला होता. त्यावेळी अनेक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता या कार्यालयाला टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) व खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. गांधी कुटुंबियांच्या या चौकशीवरून काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करून अटक (Arrested) करून घेतली होती.

दरम्यान, याआधी ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीतील काँग्रेसच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयासह देशभरात १४ ठिकाणी छापेमारी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com