निर्दयीपणाचा कळस! ...म्हणून पीडितेला फरफटत नेलं; दिल्ली प्रकरणात आरोपींचा धक्कादायक खुलासा

निर्दयीपणाचा कळस! ...म्हणून पीडितेला फरफटत नेलं; दिल्ली प्रकरणात आरोपींचा धक्कादायक खुलासा

दिल्ली | Delhi

राजधानी दिल्लीतील कंझावला अपघात प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणी सात आरोप अटकेत आहे. दरम्यान, चौकशीमध्ये आरोपींना धक्कादायक खुलासा केला आहे.

अंजली आपल्या गाडीखाली अडकली होती हे माहीत होते पण भीतीपोटी गाडी चालवत राहिल्याची कबुली त्याने पोलिसांच्या चौकशीत दिली. ती गाडीतून बाहेर निघण्याची वाट बघत गाडी फिरवत राहिल्याचे कबुली दिली आहे. त्याचबरोबर, गाडीत मोठ्याने गाणी चालू नसल्याचेही त्यांनी मान्य केले आहे.

निर्दयीपणाचा कळस! ...म्हणून पीडितेला फरफटत नेलं; दिल्ली प्रकरणात आरोपींचा धक्कादायक खुलासा
Air India च्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा 'तो' विकृत गजाआड

तीला गाडीतून बाहेर काढले तर खुनाचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती वाटत असल्याचे आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. त्यामुळे अपघातानंतर आरोपींनी त्या तरूणीली गाडीखालून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नसल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

या प्रकरणात दीपक खन्ना, कृष्ण, अमित खन्ना, मिथुन, आशुतोष अंकुश आणि मनोज मित्तल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या यातील पाच आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. अंकुशला शनिवारी जामीन मंजूर करत सोडण्यात आले आहे. त्याच्यावर असलेले आरोप जामीनासाठी पात्र असल्याचे सांगत २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंकुशचा जामीन मंजूर झाला आहे.

निर्दयीपणाचा कळस! ...म्हणून पीडितेला फरफटत नेलं; दिल्ली प्रकरणात आरोपींचा धक्कादायक खुलासा
अखिलेश यादव पोलिसांना म्हणाले, तुम्ही विष पाजलं तर, मला विश्वास नाही... नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

नेमकं काय घडलं होतं?

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील कंझावाला येथे अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला कार चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com