Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंना मोठा धक्का! दिल्ली हायकोर्टाने 'ती' फेटाळली याचिका

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! दिल्ली हायकोर्टाने ‘ती’ फेटाळली याचिका

दिल्ली | Delhi

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह वापरता येणार नाही, असे आदेश दिले होते. दोन्ही गटांमध्ये पक्षावरील हक्कावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले होते.

- Advertisement -

याविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दिल्लीउच्च न्यायालयाने ठाकरे गटाने केलेली याचिका फेटाळून लावली आहे. शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ पक्षाचे चिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसंच निवडणूक आयोगाला यासंबंधी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारकक्षेत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं.

यासंदर्भात सोमवारी सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीवेळी उद्धव ठाकरे यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला होता. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगालाही आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या