मोठी बातमी ! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय कडून अटक

मोठी बातमी ! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय कडून अटक

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister of Delhi) तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) दारू धोरणप्रकरणी (Liquor) ) आज सकाळी चौकशीसाठी सीबीआय (CBI) कार्यालयात दाखल झाले होते.

चौकशीला जाण्याआधी सिसोदिया यांनी महात्मा गांधी यांचे स्मारक असलेल्या राजघाटावर (Rajghat) जाऊन अभिवादन केले आणि सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

चौकशीला जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी ट्विट केले होते की, "आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचं प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल. पण, तुम्ही काळजी करू नका. मी भगतसिंग (Bhagat Singh) यांचा अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणं ही छोटी गोष्ट आहे."

 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्यानंतर सकाळपासून सुमारे आठ तास चौकशी झाल्यानंतर अखेर सीबीआय ने मनीष सिसोदिया यांना आज संध्याकाळी अटक केली आहे. सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

मोठी बातमी ! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय कडून अटक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; कारण काय? वाचा सविस्तर

सिसोदिया यांच्या अटकेमुळे आम आदमी पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल त्याबरोबरच, पक्षाचे सर्वेसर्वा आता अरविंद केजरीवाल याविषयी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com