Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादिल्लीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानचे लोटांगण

दिल्लीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानचे लोटांगण

शारजा । वृत्तसंस्था

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय मिळवला.

- Advertisement -

दिल्लीच्या गोलंदाजांनी यावेळी भेदक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. दिल्लीने राजस्थानपुढे विजयासाठी 185 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग राजस्थानच्या संघाला करता आला नाही.

दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सुरुवात मिळाली नाही. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर (13) मोठी खेळी साकारू शकला नाही. राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली.

पण स्मिथला यावेळी दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरीच नॉर्टजेने बाद केले आणि ही जोडी फुटली. स्मिथला यावेळी 24 धावा करता आल्या.मोठा फटका मारण्याच्या नादात जैस्वाल 34 धावांवर बाद झाला.

राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने दिल्लीला सुरुवातीला दोन धक्के दिले. त्याचबरोबर दिल्लीचे दोन फलंदाज धावचीत झाले. दिल्लीने यावेळी राजस्थानला विजयासाठी 185 धावांचे आव्हान ठेवले होते. राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

दिल्लीच्या संघाला यावेळी चांगली सुरुवात करता आली नाही. कारण त्यांचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. शिखर धवनला यावेळी पाच धावा करता आल्या, तर पृथ्वी साव 19 धावांवर बाद झाला. रिषभ पंतने तर यावेळी धावचीत होत आत्मघात केला, त्याला पाच धावा करता आल्या.दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला जैस्वालने धावचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. श्रेयसला यावेळी22 धावांवर समाधान मानावे लागले.

मार्कसला राहुल टेवाटियाने कर्णधार स्टीव्हन स्मिथकरवी झेल बाद केले आणि ही जोडी फोडली. मार्कसला यावेळी 39 धावा करता आल्या. दिल्लीच्या संघाकडून यावेळी सर्वाधिक धावा या हेटमायरनेच केल्या. हेटमायरने 24 चेंडूंत एक चौकार आणि पाच षटकारांसह 45 धावांची खेळी साकारली. आर्चरने या सामन्यात भेदक मारा करत तीन बळी मिळवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या