Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यारोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय

रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय

शारजा । वृत्तसंस्था

चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. .

- Advertisement -

नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात सॅम करनला माघारी परतला यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसन आणि सॅम करन या जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

दोन्ही फलंदाजांनी शानदार प्रदर्शन करीत दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. डु-प्लेसिसने आक्रमक पवित्रा घेत चांगली फलंदाजी करत दिल्लीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं. अखेरीस नॉर्जने वॉटसनचा त्रिफळा उडवत दिल्लीला मोठं यश मिळवून दिलं.

दरम्यानच्या काळात डु-प्लेसिसने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत डु-प्लेसिसने ४७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या.चेन्नईने दिल्ली ला १८० धावांचं आव्हान दिले

१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ दिपक चहरच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात माघारी परतला. यानंतर अजिंक्य रहाणेही झटपट माघारी परतल्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला.

आयपीएलच्या कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला आहे.कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनची चांगली जोडी जमली. दोन्ही फलंदाजांनी ६८ धावांची भागीदारी करत दिल्लीच्या डावाला आकार दिला.

चेन्नईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीनेपूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. अक्षर पटेलने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर षटकार लगावत दिल्लीला सामन्यात विजय मिळवून दिला. शिखर धवनने या सामन्यात नाबाद १०१ धावांची खेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या