Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासक्षम उमेदवाराला नक्कीच संधी देऊ!

सक्षम उमेदवाराला नक्कीच संधी देऊ!

नाशिक । निशीकांत पाटील Nashik

सध्या मनपा निवडणुकीच्या NMC Upcoming Elections पार्श्वभूमीवर लोकांशी संवाद साधत असताना खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NCP नक्कीच यश संपादन करेल यात शंकाच नाही. महिलांविषयी सुरक्षितता आणि राजकारणात त्यांचा कसा सहभाग वाढवता येईल याकडे लक्ष असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष अनिता भामरे NCP Women City President Anita Bhamre यांनी ‘देशदूत’शी बोलताना व्यक्त केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

- Advertisement -

प्रश्न : आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल ?

उत्तर – पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सन्मानाने जागा द्याल तर नक्कीच महाविकास आघाडीचा विचार केला जाईल.त्यानुसार वरिष्ठ पातळीवर जी भूमिका ठरवली जाईल त्यानुसारच आम्ही काम सुरू ठेवू.

प्रश्न : मनपा निवडणुकीत महिलांना प्राधान्य कसे दिले जाईल ?

उत्तर – महिलांना सर्वच क्षेत्रात 50 टक्के आरक्षण असल्याने प्राधान्य तर दिले जाणार आहे.

प्रश्न : निवडणूक काळात महिलांच्या समस्यांचा विचार होतो असे तुम्हाला वाटते का ?

उत्तर – हो नक्कीच होतो. कारण पन्नास टक्के आरक्षण असल्याने योग्य महिला उमेदवाराला उमेदवारी करण्याची संधी दिली जाईल.

प्रश्न : सध्या नागरिकांशी संवाद साधण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका कशी आहे ?

उत्तर – आम्ही आता मतदारांकडे जात आहोत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलेला नाशिक शहराचा विकास व त्यांनी केलेली कामे आम्ही सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवत आहोतच. मतदारांकडे फिरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या प्रकारची पसंती मिळत आहे. मनपात सध्या सत्ताधारी असलेल्या पक्षाला लोक आता कंटाळले आहेत.

प्रश्न : कोविड काळात केलेल्या कामांचा फायदा मतदानाच्या स्वरूपात मतपेटीत पडेल का ?

उत्तर – नक्कीच पडेल, कारण लॉकडाउनच्या वेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रिपद असल्याने त्यांनी मोफत धान्य वाटप केले. तसेच, परराज्यातील लोकांसाठी देखील मोफत धान्य दिले. शिवभोजन थाळी देखील मोफत ठेवली होती. नक्कीच या कामाची पावती आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल यात शंकाच नाही.

प्रश्न : सध्या राजकारणात महिलांची संख्या फार कमी आहे ती वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल ?

उत्तर – महिलांसाठी शहरात ग्रीन जिम तसेच शौचालयाची पूर्तता मनपात केलेली आहे. काही ठिकाणी झाले व काही ठिकाणी बाकी आहे. काम करत असताना महिलांची सुरक्षितता ही फार महत्त्वाची आहे. या मुद्द्यावर आम्ही भर देणार आहोत. जेणेकरून राजकारणात देखील महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

प्रश्न : मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीने काही उपाययोजना केल्या आहेत का ?

उत्तर – मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिस्त प्रामाणिक व भ्रष्टाचार विरहित कारभार करणार आहोत.

प्रश्न : आगामी मनपा निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी देणार की जुन्या चेहर्‍यांना ?

उत्तर – ज्या महिला उमेदवार निवडून येण्यासाठी सक्षम असतील त्यांना नक्कीच संधी दिली जाईल.

प्रश्न : ठिकाणी घराणेशाहीचा विषय येतो सर्वसामान्य घरातील महिला पुढे येण्यासाठी काही मार्ग काढता येईल का ?

उत्तर – घराणेशाहीचा आरोप हा प्रत्येक पक्षात होतोच. मात्र निवडून येण्यासाठी पात्र उमेदवाराला येथे प्राधान्य दिले जाईल.

प्रश्न : सध्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या फार कमी आहे, ती वाढविण्यासाठी काही रणनीती आखली आहे का ?

उत्तर – गेल्या निवडणुकीत पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार देवीदास पिंगळे अडचणीत होते. मात्र येणार्‍या निवडणुकीत पूर्वीसारखी परिस्थिती नसल्याने राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील यात शंकाच नाही.

प्रश्न : मनपावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास काय बदल करू शकणार ?

उत्तर – रस्ते, लाईट, पाणी या सुविधा तर आहेतच आणि त्या होणारच आहेत. मात्र त्या व्यतिरिक्त वेगळ्या काही सुविधा देता येतील याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशेष लक्ष राहील. आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या