या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या

या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या

नवी दिल्ली:

मला कोरोना होऊन गेलाय, तर मी आता लस घेतली तर चालेल का? किंवा किती दिवसांनी मी लस घेऊ? असे प्रश्न अनेकजण आता विचारतात? या प्रश्नाचे उत्तर सध्या सहा महिने आहे. आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांवरुन हा कालावधी नऊ महिने होणार आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशन (The National Technical Advisory Group on Immunisation)(NTAGI)या शासनाच्या समितीने ही शिफारस केली आहे.

या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या
PUBG Mobile गेम नव्या नावाने, आजपासून नोंदणी सुरु

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आता लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. यामुळे कोरोना लसीकरणाच्या धोरणातही बदल होत आहेत. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय नुकताच नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशनकडून घेण्यात आला.

या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या
Petrol Price: नाशिकमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर, आतापर्यंतचा सर्वोच्च दर

का करणार हा बदल?

एखाद्या व्यक्तीने कोरोनावर मात केल्यानंतर त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतात. या अँटिबॉडी पुढील काही महिने त्याचे कोरोनापासून रक्षण करतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ९ महिन्यांनंतर लसीचा डोस द्यावा, अशी शिफारस नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशनकडून (NEGVAC) याबद्दलचा निर्णय घेण्याचा शक्यता आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना ९ महिन्यांनंतर लस देण्यात यावी अशी शिफारस या गटाने केली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना ६ महिन्यांनंतर लस देण्याचा निर्णय नुकताच घेतला गेला होता.

NIAGI च्या या सल्ल्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही सूचना आता केंद्र सरकारकडे पाठवली आहे. NIAGI ने हा सल्ला देण्यापूर्वी कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसबाबतही महत्वाची सूचना केली होती. कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोस मधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडून त्याची अंमलबजावणी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com