Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर्स तत्काळ बदलून मिळणार - उपमुख्यमंत्री

नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर्स तत्काळ बदलून मिळणार – उपमुख्यमंत्री

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर्स तत्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी सौर ऊर्जीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत नुकतीच एक प्रीबीड बैठक झाली आहे. दिवसापेक्षा रात्री वीज स्वस्त मिळत असल्याने काही वेगळे उपाय करता येतील का, याबाबतही विचार करण्यात येत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात वीजपुरवठ्याअभावी पीकांचे हाल होत असल्याबाबत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाजपच्या संजय कुटे, राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, प्राजक्त तनपुरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर्सचा पूल तयार करण्यात येईल. आज प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरवर भार आल्याने ट्रान्सफॉर्मर जळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ट्रान्सफॉर्मरसाठी रिप्लेस आणि रिपेअर असे धोरण करण्यात येईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात व्हेंडर बेस निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मदत घेण्यात येईल.

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प प्रस्तावित केले असून, सन २०२५ पर्यंत ५० टक्के सौरऊर्जा फीडर प्रकल्पाचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांना वीज उपलब्धतेसाठी सौर ऊर्जेवरील प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. राज्यात सध्या १५ लाख २३ हजार ४२६ ग्राहकांनी आतापर्यंत एकही वीज देयक गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये भरलेले नाही. त्यांना थकीत देयके भरा अशा सूचना नाहीत तर चालू बील भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या