Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशलोकशाहीला काळिमा : चार आमदारांनी धरले अन् उपसभापतींना खुर्चीतून खेचले

लोकशाहीला काळिमा : चार आमदारांनी धरले अन् उपसभापतींना खुर्चीतून खेचले

बंगळुरु:

सभागृहात गोंधळ, कागदपत्रे भिरकवणे हे नित्याचेच झाले आहे. मात्र, आज लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली.

- Advertisement -

गेल्याच आठवड्यात कर्नाट विधानसभेत गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर झाले होते. त्यावेळी काँग्रेसने सभात्याग करत निषेध नोंदवला होता. कर्नाटक विधानपरिषेदत मंगळवारी गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाला. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागले. कर्नाटक सरकारने गायींची रक्षा करणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात मांडले होते. मात्र, या विधेयकामुळे गोरक्षकांना संरक्षण मिळेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे.

आम्ही सभापतींना खुर्चीवरुन खाली उतरल्यास सांगितले. परंतु ते उतरले नाही. अवैधरित्या ते सभापतींच्या खुर्चीवर बसले होते.

प्रकाश राठोड, काँग्रेस आमदार

- Advertisment -

ताज्या बातम्या