याच वेळेत फोडा फटाके, अन्यथा गुन्हा दाखल होणार

याच वेळेत फोडा फटाके, अन्यथा गुन्हा दाखल होणार

दिवाळी (diwali)सुरु झाली आहे आणि फटाक्यांचा बार उडण्याआधीच पोलिसांनी (police)इशारा दिला आहे. रात्री 10 नंतर फटाके फोडणाऱ्यांवर पोलीस थेट गुन्हे दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court)निर्देशानुसार पोलिसांनी फटाके फोडण्याची वेळ संध्याकाळी 8 ते 10 अशी ठरवून दिली आहे.

याच वेळेत फोडा फटाके, अन्यथा गुन्हा दाखल होणार
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

नागपूर पोलिसांनी फटाके विक्री आणि फोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. यासाठी शहरात 33 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक पथक आणि गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. नागपुर पोलिसांनी पोलिसांनी फटाके फोडण्याची वेळ संध्याकाळी 8 ते 10 अशी ठरवून दिली आहे.

माध्यमांशी बोलताना नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ग्रीन फटाक्यांची खरेदी-विक्री करता येणार आहे. ग्रीन फटाकेच फोडण्याची परवानगी आहे. फटाके विक्रेत्यांच्या संघटनेसोबत आमची बैठक झालेली आहे. त्यांना नियमाविरुद्ध फटाक्यांची विक्री न करण्याचं आवाहन केलेलं आहे', असं आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

याच वेळेत फोडा फटाके, अन्यथा गुन्हा दाखल होणार
Photo: अयोध्या भव्य दिवाळीला सुरुवात : लेजर शो अन् दिव्यांचा विश्वविक्रम

दीपोत्सवाचं आवाहन

दिपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. करोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा असं आवाहन महाराष्ट्र सरकारने लोकांना केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com