Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरातील पूर टळला; मंत्री केसरकरांचं वक्तव्य चर्चेत

शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरातील पूर टळला; मंत्री केसरकरांचं वक्तव्य चर्चेत

मुंबई । Mumbai

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते आता चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा हे वक्तव्य चांगलाच व्हायरल होत आहे. मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरात पूर आला नाही असं वक्तव्य त्यांनी केल आहे. याला श्रद्ध म्हणा की अंधश्रद्धा असेही केसरकर यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा. पूरपरिस्थिती असताना मी योगायोगाने शिर्डीत गेलेलो होतो. कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले की, 5 फूट पातळी वाढते हे सर्वांना माहिती आहे. पण यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो, त्यामुळे एक फुटानेही पातळी वाढली नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही तपासून पाहू शकता. मी ठाण मांडून होतो. त्यावेळी मी देवाकडे हे संकट टळू दे अशी प्रार्थन करत होतो. त्या प्रार्थनेतही ताकद असते. तुम्ही पाटबंधारेकडे चौकशी केली तर ५-६ फूट पाण्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असती ही माहिती मिळेल. निसर्गात पण देव आहे. प्रार्थनेत ताकद आहे, अध्यात्म महत्वाचे आहे,’ असं दिपक केसरकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

दीपक केसरकर यांनी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. केसरकर म्हणाले की, मी त्यांना गड किल्ले यासंदर्भात ओळखतो. त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करणे थांबवावे. पण वयामुळे असं होत असेल. गृहमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही त्यांचं वक्तव्य तपासून पाहू. मी भेट झाल्यावर त्यांना (संभाजी भिडे) सांगेल. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे देशाला दुःख होतं, त्यांनी इतर विषयांवर भाष्य करू नये, अशी माझी नम्र विनंती आहे असेही केसरकर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या