Saturday, April 27, 2024
Homeजळगावप्राथमिक शाळेत शिक्षक होऊ इच्छिणार्‍यांसाठी ही बातमी आहे महत्त्वाची..

प्राथमिक शाळेत शिक्षक होऊ इच्छिणार्‍यांसाठी ही बातमी आहे महत्त्वाची..

रवींद्र पाटील

 गुढे ता भडगाव (वार्ताहर)

- Advertisement -

प्राथमिक शाळांमध्ये (primary schools) शिक्षक (Teacher) होण्यासाठी लागणारे डि.एड. (D.ed.)येत्या शैक्षणिक वर्षापासून (जुन 2023) पासून कायमचे बंद होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (new National Education Policy) शिक्षक होण्यासाठी बी.एड. (B.Ed) करावेे लागणार आहे.

सध्याच्या प्रचलित शैक्षणिक पद्धतीत झेडपी शाळांवरील (प्राथमिक) शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर दोन वर्षाचे डीएड करावे लागते. तर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारक आहे. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना ‘बीएड’च करावे लागणार आहे.

त्यात स्पेशलायझेशन असणार आहे.ॲकॅडमिक कौन्सिलने देखील त्यास मान्यता दिली असून प्राध्यापकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ५ एप्रिलला बैठक होणार असून त्यात नवीन शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न लागू असणार आहे. सध्या शिकत असलेल्यांना हा पॅटर्न लागू असणार नाही

‘पदवी’ पूर्ण करण्यासाठी ७ वर्षांची मुदत 

सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार, तीन वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांची कालमर्यादा ठरलेली आहे. पण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा काळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. दरम्यान,’पीजी’ केलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षात बीएड करता येईल.

तर पदवी घेतलेल्यांना दोन वर्षे तर बारावीनंतर बीएडसाठी चार वर्षे लागणार आहेत.नवीन धोरणात ‘डीएड’ नाही.प्राथमिक व माध्यमिक शिक्षक होण्यासाठी ‘बीएड’च करावे लागणार आहे.पण,विषय निवडताना कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे त्यावरून विषयाची निवड करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या