कांदा दरात मोठी घसरण

कांदा दरात मोठी घसरण

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

गेल्या तीन ते चार आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये onion rates वाढ होत असताना आज कांदा दरवाढीला ब्रेक लागला. अफगाणिस्तानमधून कांदा आयात Onion imports from Afghanistan सुरू झाल्याची माहिती मिळताच बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये 450 रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली.

अफगाणिस्तानातून आयात केलेला सहा गाडी कांदा हा अमृतसर बॉर्डरवर पोहोचलेला आहे. आयात झालेला कांदा अगदी नगण्य असला तरी भविष्यात मोठ्या प्रमाणात कांदा आयात होऊ शकतो, या भीतीपोटी कांदा दरात घसरण पहायला आहे. दि.13 ऑक्टोंबर रोजी कमाल 4130 रुपये प्रतिक्विंटलने विक्री झालेला कांदा काल कमाल 3682 रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाला आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1100 सरासरी 3350 तर जास्तीत जास्त 3682 रुपये भाव मिळाला अफगाणिस्तानमध्ये कांद्याचे यंदा बंपर पीक आले आहे तर दुसरीकडे भारतामध्ये कांद्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकार कांदा आयात करण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त हाती आली आहे.

सध्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा विक्रीस येत असून उन्हाळ कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीमध्ये साठवून ठेवलेला आहे. जवळपास सहा महिने पासून हा कांदा चाळीमध्ये साठवल्याने बदलत्या वातावरणामुळे या कांद्याच्या वजनामध्ये आणि प्रतवारी मध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे कांद्याचे बाजार तेजीत दिसत असले तरी मात्र याचा खूप काही फायदा शेतकर्‍यांना होताना दिसत नाही. सरकारने निर्णय घेताना शेतकरी वर्गाचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.