Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यारुग्णसंख्येत घट हा रस्त्यावरील कामाचा परिणाम : जिल्हाधिकारी मांढरे

रुग्णसंख्येत घट हा रस्त्यावरील कामाचा परिणाम : जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि रुग्णसंख्या रोखण्यासाठी नाशकात लागू केलेल्या कडक लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रस्त्यावर उभे राहून केलेल्या कामाचे चिज होताना दिसत असून पंतप्रधानांनी पोलीस, आरोग्यसेवक, महसूल सेवकांंचे अभिनंदन केले आहे. आपण उपलब्ध साधनसामुग्रीच्या जोरावरच करोनावर विजय मिळवण्यात यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

- Advertisement -

शहर पोलिसांच्या मदतीला धावलेल्या विशेष पोलीस अधिकार्‍यांचा सत्कार काल सांगली बँक सिग्नल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मांढरे बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

यावेळी मांढरे यांनी बोलताना सांगितले की, बाकीच्या देशात करोनाशी लढण्यासाठी मोठी साधनसामग्री उपलब्ध होती. मात्र भारताकडे साधनसामग्रीची कमतरता होती. असे असतानाही आपण उपलब्ध साधनसामुग्रीच्या जोरावर करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यात आपल्याला यश येत आहे. सध्या म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपचारासाठी नाशिकला 14 हजार व्हायल्स गरजेच्या आहेत. मात्र, त्या 200 मिळत आहेत. असे असतानाही आपले डॉक्टर रुग्णांना वाचविण्यासाठी धडपड करत आहे, असे मांढरे यांनी सांगितले.

यावेळी कडक निर्बंधात पोलिसांच्या मदतीला आलेल्या विशेष पोलिसांचे मनोबल वाढावे, यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी विशेष पोलिसांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. करोना काळात पोलीस प्रशासन अहोरात्र काम करत आहेत. त्यांना मदत म्हणून समाजातील काही नागरिक विशेष पोलीस अधिकरी म्हणून पोलिसांसोबत बंदोबस्त करुन मदत करत आहेत. याच विशेष पोलीस अधिकार्‍यांचे आभार मानून त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सरकारवाडा पोलिसांच्या वतीने सराफ व कपडा असोसिएशनच्या 45 पदाधिकार्‍यांना विशेष पोलीस अधिकारी असा दर्जा देण्यात आला. हे अधिकारी सध्या सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील विविध चेकनाक्यांवर गर्दीवर नियंत्रण व विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून चोख ड्यूटी बजावत आहेत.

यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, पोलीस निरीक्षक नम्रता देसाई, नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरी किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहूल थोरात, माजी अध्यक्ष चेतन राजापूरकर, योगेश दंडगव्हाळ, सुनील महालकर, कृष्णा नागरे, शाम तांबोळी, पवन महालकर, सुनीता दौंडकर, सुभाष सोनवणे, कपडा असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, नीलेश जाजू, हेमंत कुलकर्णी, तुषार मनियार, पवन पारख, मकरंद सुखात्मे आदींसह पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या