जिल्ह्यातील शाळांबाबत लवकरच निर्णय; शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यास सुरुवात

जिल्ह्यातील शाळांबाबत लवकरच निर्णय; शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यास सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई (Mumbai) पाठोपाठ नवी मुंबई, पुणे (Pune) महापालिकेनेही वाढत्या करोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 31 जानेवारीपर्यंत शाळा (School) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात येत असून शाळा पुन्हा ऑनलाईन सुरु राहणार आहेत.

नाशिक शहरासह जिल्हयातही तीन- चार दिवसांपासून रूग्ण संख्येत झपाटयाने वाढ झाल्याने शहरासह जिल्हयातील शाळा बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यास सुरूवात केली असून, आठवडाभरात शाळा बंदवर शिक्कामोर्तब होऊ शकते.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण विभागाने पावणेदोन वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 10 डिसेंबर 2021 पासून शहरासह जिल्हयातील प्राथमिक वर्ग सुरू झाले होते. या वर्गापाठोपाठ आदिवासी विभागानेदेखील प्राथमिक वर्ग सुरू केले होते. '

शाळा सुरू झाल्यानंतर शहरातील चांदशी शिवारातील एक नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांला ओमायक्रॉनची (Omicron) लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही शाळा 3 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील आदिवासी आश्रमशाळेतील 14 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली होती.

पंचवटीतील (Panchavati) एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात दोन दिवसात 27 विद्यार्थींनीना करोनाची लागण झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतू, ही लागण आटोक्यात आल्याने शाळा सुरू होत्या. मात्र, गत तीन ते तार दिवसांपासून मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये ओमायक्रॉनचे रूग्ण झपाटयाने वाढू लागले आहे.

मुंबईत तर, रूग्णवाढीचा वेग दुप्पट असल्याने मुंबईतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिकेने देखील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरासह जिल्हयातील ग्रामीण भागातही आठवडयापासून रूग्ण संख्या वाढत आहे.

गत तीन दिवसात करोनाबाधितांची संख्या 500 च्या वर गेली आहे. रूग्ण संख्या वाढत असल्याने नाशिक शहर व जिल्हयातील सुरू झालेल्या शाळा बंद कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांनी शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे.

Related Stories

No stories found.