10 कोटींच्यावरील खर्चावर आज महापालिका स्थायी सभेत निर्णय

10 कोटींच्यावरील खर्चावर आज महापालिका स्थायी सभेत निर्णय

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत नाशिक महापालिका प्रशासनाकडुन तातडीच्या उपाय योजना केल्या जात असुन रुग्णांना तात्काळ आरोग्यसेवा व सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडुन तातडीने निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयातील रेमडेसिवीर खरेदी, अँटीजेन किट खरेदी, आरटीपीसीआर चाचणी याकामी सुमारे 10 कोटी रुपयांच्यावरील खर्चास आज (दि.22)च्या महापालिका स्थायी सभेत मंजुरी दिली जाणार आहे.

महपाालिकेच्या स्थायी समितीची दि.19 एप्रिल रोजी स्थगित करण्यात आलेली सभा आज (दि22) सकाळी 11 वाजता ऑनलाईन स्वरुपात सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत शहरातील विकास कामांबरोबरच करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी सुरू असलेल्या उपाय योजनांच्या कामांवरील खर्चास मान्यता दिली जाणार आहे.

याकामात रॅपिड अँटीजेन किट खरेदीसाठी 57 लाख 12000 रुपयांच्या मर्यादेत राहुंन झालेल्या व होणार्‍या खर्चास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत, आरटीपीसीआर नमुना चाचणी स्थानिक प्रयोगशाळा दातार जेनेटिक्स यांच्याकडुन न्यनतम दरात करण्यासाठी 2 कोटी 85 लाख रुपयांच्या मर्यादेत राहुन झालेल्या व होणार्‍या खर्चास कार्योत्तर मान्यता मिळणेबाबत, करोना बाधीत रुग्णांवर उपचारासाठी लागणार्‍या ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मशिन खरेदीकामी 45 लाख 98500 रुपयांच्या मर्यादेत राहुन खर्चास कार्योत्तर मंजुरी देणेबाबत, आरोग्य विभागात मानधनावर असलेल्या वैद्यकिय अधिकारी, सीएमओ, स्टाफ नर्स, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध मिश्रक या पदांना सहा महिन्याची मुदत वाढ मिळणे बाबत,

तसेच कोविड रुग्णांसाठी लागणारे रेमडिसीवीर इंजेक्शन मुळ उत्पादक कंपनीकडुन तथा अधिकृत वितरकाकडुन खरेदीकरणेकामी 3 कोटी 13 लाख 60000 रुपयांच्या मर्यादीत राहुन करण्यात येणार्‍या खर्चास कार्योत्तर मंजुरी मिळणेबाबत अशा विषयावर निर्णय घेतला जाणार आहे. या सभेतील मंजुरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com