
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
महाराष्ट्र सदन बांधकामाशी संबंधित ८५० कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखलेला खटला रद्द करा,अशी विनंती करणार्या भुजबळ कुटुंबीयांच्या (Bhujbal Family) अर्जांवर विशेष पीएमएलए न्यायालयाने (PMLA Court) शुक्रवार (दि.२७ ऑक्टोबर) रोजी निर्णय देण्याचे निश्चित केले आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांचे पुत्र पंकज भुजबळ, पुतणे समीर भुजबळ व इतरांच्या अर्जांवर सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय उद्या शुक्रवार (दि.२७ ऑक्टोबरला) देणार असल्याचे स्पष्ट केले...
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra Sadan scam case) जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सखोल तपासाचे निर्देश दिले होते. त्या तपासाच्या आधारे छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ, पुतणे समीर भुजबळ यांच्यासह अन्य जणांविरोधात तीन स्वतंत्र एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले. त्यानंतर त्याच आधारावर आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला.
ईडीने दाखल केलेला हा खटला रद्द करण्याची विनंती करत पंकज व समीर भुजबळ यांच्यासह संजय जोशी, तन्वीर शेख, सत्येन केसरकर व राजेश धारप यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात दाद मागितली. त्यांच्या अर्जांवर सुनावणी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने (Court) निर्णय राखून ठेवला. आज गुरूवारी निर्णय अपेक्षित होता. मात्र न्यायालय अन्य न्यायालयीने कामकाजात व्यस्त असल्याने निर्णय उद्या म्हणजेच २७ ऑक्टोंबरला दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.