महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डबाबत लवकरच निर्णय

महाराष्ट्र चेंबरच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद
महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डबाबत लवकरच निर्णय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील व्यापारी उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनात केली. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

शिष्टमंडळात अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन संजय सोनवणे व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेऊन नुकतीच नॅशनल ट्रेडर्स बोर्डची स्थापना केली आहे. या रचनेमध्ये राज्यांनी राज्यस्तरावर अशा बोर्डची स्थापना करणे अभिप्रेत असल्याचे सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

महाराष्ट्रात सध्या एक कोटीहून अधिक संख्येने असलेल्या व्यापार्‍यांच्या विकासासाठी महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करणे आवश्यक असल्याचे चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यातील व्यापारी उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची तसेच राज्यातील व्यापार उद्योग क्षेत्राचे प्रश्न, नवीन उद्योगांना सवलती, वीज दरवाढ, व्यापार क्षेत्राचे प्रश्न, फूड सेफ्टी अ‍ॅक्ट, बाजार समिती कायदा, महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील दुकान गाळ्याच्या भाड्याचे प्रश्न अशा विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी मुख्यमंत्र्ंंयांकडे केली.

यावेळी लवकरच अधिकार्‍यांशी चर्चा करुन यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.याप्रसंगी कार्यकारिणी सदस्य राजाराम सांगळे, सचिन शहा, व्हीनस वाणी, मनीष रावल, दत्ता भालेराव, रणजितसिंग आनंद, नेहा खरे, अजय शहा, ओमप्रकाश गगराणी, भावेश मानेक, संजय राठी, रवींद्र झोपे, कैलास पाटील, रतन पडवळ आदींसह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com