निवडणूक आयोगाचा निर्णय घटनेनुसार: आठवले

jalgaon-digital
3 Min Read

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devlali Camp

राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वानुसारच निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेबाबत निर्णय घेतलेला असून

लोकशाही (Democracy) प्रणालीमध्ये बहुमताला किंमत असते याचे भान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठेवायला हवे होते, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale) यांनी पत्रकार परिषदेत केले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे जैन मंदिर असलेल्या लॅमरोड (lam road) परिसरातील कलापूर्णम तीर्थस्थानातला भेट देण्यासाठी आठवले हे देवळालीत (devlali) आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक गोष्टीवर प्रकाशझोत टाकला. पत्रकारांच्या पत्राला प्रश्नांना उत्तर देताना आठवले यांनी सांगितले की, केंद्र व राज्यात आमची भाजप व शिवसेनेबरोबर युती असून आगामी लोकसभा (Lok Sabha), विधानसभासह (Assembly) स्थानिक पातळीवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समिती (panchayat samiti) व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Cantonment Board) निवडणुका (election) यादेखील महायुतीच्याच माध्यमातून लढवण्याच्या आमचा निर्णय आहे.

सध्या रिपब्लिकन पक्ष (Republican Party) हा व्यापक झाला असून अनेक जाती धर्माचे लोक या पक्षात सामील होत आहेत. त्यामुळे नागालँड (Nagaland), मेघालय (Meghalaya), त्रिपुरा (Tripura) सारख्या राज्यातही आमच्या पक्षाला जनाधार मिळत असल्याने तेथील निवडणुकांमध्ये देखील आम्ही पूर्ण ताकदीने उतरत आहोत. डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामध्ये सर्वाच्या संरक्षणाचा मुद्दा नमूद असल्याने आज देशातील जनता भयमुक्त जीवन जगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची वाटचाल अतिशय गतिमान असल्याने जागतिक पातळीवर त्याची नोंद घेतली जात आहे.

काँग्रेसने (congress) जे 70 वर्षात केले नाही ते भाजपने 9 वर्षात करून दाखवले. त्यामुळे ‘संविधान खतरे मे है’ हा काँग्रेस व विरोधकांचा प्रचार खोटा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कसबापेठ व चिंचवड या पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.

देवळाली रेल्वे स्टेशनवर पूर्वी थांबणार्‍या सर्व गाड्यांना पुन्हा थांबा देणे, भगूर येथील स्वा. सावरकर स्मारकाप्रमाणे देवळालीतील जैन समाजाचे कलापूर्णम तीर्थधाम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहरातील ज्ञानमंदिराचा समावेश जिल्हा पर्यटन मंडळाच्या यादीत करणेबाबत राज्य शासनाला सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी पत्रकार परिषदेविषयी सविस्तर माहिती दिली. प्रदेश पदाधिकारी संतोष कटारे यांनी आभार मानले. पत्रकार परिषदेला विश्वनाथ काळे, भाऊसाहेब धीवरे, अमोल पगारे, सिद्धार्थ पगारे, आर.डी. जाधव, चंद्रकांत भालेराव, सुनील लक्ष्मण कांबळे, प्रमोद बागुल, रामबाबा पठारे, महेश सुकेनकर, सनी साळवे, सुभाष बोराडे, सुरेश निकम, पंडित साळवे, गौतम भालेराव, अशोक साळवे, संतोष गायकवाड, विजय निकम, महेंद्र सोनवणे, राजाभाऊ वाघमारे, आदर्श सावंत, रवींद्र गायकवाड, भारत निकम, समीर शेख, गिरीश मोरे, राजू जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *