Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याHSC Exam : इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका, बोर्डाने घेतला 'हा' मोठा निर्णय

HSC Exam : इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका, बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

राज्यात बारावीची परीक्षा (HSC Exam 2023) सुरू झाल्यापासून पेपरफुटीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काल (३ मार्च २०२३) रोजी बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. तर यापूर्वी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तर छापण्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे या पेपरफुटीचे पडसाद सध्या सरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील उमटले होते. यानंतर आता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेबाबत राज्य मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे…

- Advertisement -

२१ फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. या इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता विभागातील (Portry Section) प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. तसेच इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी सहा गुण होते. यानंतर विषय तज्ज्ञ आणि मुख्य नियामकांच्या संयुक्त सभेत या चुकलेल्या प्रश्नांबाबत चर्चा झाली.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

त्यानंतर संयुक्त सभेच्या अहवालानुसार आता राज्य मंडळाने निर्णय घेतला असून, पोएट्री विभागातील अन्य कोणतेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असल्यास, त्रुटी असलेल्या ए ३ ते ए ५ या प्रश्नांचे क्रमांक केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास, उत्तरपत्रिकेत पोएट्री विभाग पोएट्री सेक्शन २ असा उल्लेख केला असल्यास प्रत्येक प्रश्नाला दोन या प्रमाणे सहा गुण दिले जाणार आहेत.

अभिनेत्री Tunisha Sharma च्या आत्महत्या प्रकरणात शिझान खानला जामीन मंजूर

दरम्यान, राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे संयुक्त सभा झाली नव्हती. संयुक्त सभा न झाल्याने इंग्रजीच्या चुकलेल्या प्रश्नांबाबत राज्य मंडळाने निर्णय घेतला नव्हता. अखेर बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर शुक्रवारी संयुक्त सभा झाली. त्यात चुकलेल्या तीन प्रश्नांबाबतच्या सहा गुणांचा निर्णय घेण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या