अधिवेशनानंतरच मनपा महापालिका निवडणुकीचा फैसला

अधिवेशनानंतरच मनपा  महापालिका निवडणुकीचा फैसला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) सूचनेनुसार नाशिकमध्ये (nashik) तयार होणार्‍या 43 त्रिसदस्यीय व एक 4 सदस्य प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करून आयोगाकडे पाठवला आहे.

त्यानंतर आयोगाने पदाधिकार्‍यांना पाचारण करून त्याची छाननी देखील केली आहे. अद्याप त्याची प्रसिद्धी झाली नाही, यामुळे निवडणुका (election) फेब्रुवारी ऐवजी पुढे जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या राज्य अधिवेशनाच्या (State Convention) समारोपानंतरच निवडणूक कधी होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुका कधी व कशा पद्धतीने घ्यायचे याचे सर्वाधिकार निवडणूक आयोगाकडे (Election Commission) असतो तर प्रशासन त्याची अंमलबजावणी करते.

सध्या महाराष्ट्र (maharashtra) राज्याचे अधिवेशन मुंबईत (mumbai) सुरू आहे. ते मंगळवारी (दि. 28) रोजी संपणार आहे. यानंतरच शासन व निवडणूक आयोग यांच्यातील अधिकार्‍यांमध्ये बैठक होणार असल्याचे समजते व त्यानंतरच निवडणुका कधी होणार त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्याचे वातावरण पाहिले तर निवडणुका पुढे जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नाशिकसह राज्यातील बृहन्मुंबई (Greater Mumbai), ठाणे (thane), उल्हासनगर (ulhasnagar), भिवंडी-निजामपूर (Bhiwandi-Nizampur), पनवेल (panvel), मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad), पुणे (pune), सोलापूर (solapur), नाशिक (nashik), मालेगाव (malegaon), परभणी (parbhani), नांदेड (nanded)-वाघाळा, लातूर (latur), अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या 18 महापालिकांच्या विद्यमान पंचवार्षिक कारकीर्दीची मुदत जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात येत आहे.

भाजपसाठी (bjp) उपयुक्त ठरलेली 4 सदस्यीय प्रभाग पध्दत रद्द करत 3 सदस्यीय प्रभागरचना अस्तित्वात आणण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) घेतला आहे. यानुसार आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करून आयोगाकडे रवाना केलेला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र हा निर्णय अधिवेशन संपल्यानंतर होणार असल्याची दाट शक्यता आहे.

अधिवेशन काळात किंवा त्या अगोदर प्रभाग रचना जाहीर केली असतील तर त्याचा परिणाम विविध पक्षातील नेत्यांनी व त्याचे स्थानिक आमदारांवर झाला असता. कारण त्यांना स्थानिक पातळीवर देखील लक्ष द्यावे लागले असते अधिवेशनात द्यावे लागले असते, यामुळे प्रभाग रचना जाहीर करण्यात आली नसल्याची देखील चर्चा आहे. अधिवेशन झाल्यानंतर याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे लोकांना पूर्णवेळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मिळेल, अशी काळजी घेण्यात आल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com