Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामास्क वापराबाबत निर्णय घ्यावा; राज्य सरकारला सूचना: डॉ.भारती पवार

मास्क वापराबाबत निर्णय घ्यावा; राज्य सरकारला सूचना: डॉ.भारती पवार

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

करोनाचा (corona) उद्रेक देशात पुन्हा एकदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्यावतीने (Central Govt) संपूर्ण आरोग्य यंत्रणेला

- Advertisement -

सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात करोनाचे रूग्ण वाढत असल्याने चिंता वाढतआहे. त्यामुळे ठिकठिकाणी आढावा घेण्यात येत आहे. राज्य सरकारने मास्क (Mask) वापराबाबत निर्णय घ्यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी दिली. नाशिक जिल्हयात (nashik district) सध्या 90 च्या वर करोना बाधित रुग्णांची संख्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी मंगळवारी (दि.4) जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून (District Health System) आढावा घेतला.

करोनाचा (corona) नवा विषाणू आहे का? याबाबत सर्वेक्षण करण्याचे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळा, याशिवाय जर गेलाच तर त्या ठिकाणी जाताना मास्क (Mask) लावून जावे अशा स्वरूपाचे आवाहन डॉ. पवार यांनी करत मास्कबाबत संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचेही स्पष्ट केले.

देशभरात करोना रुग्ण (Corona patient) वाढत असताना राज्यातही करोना रूग्ण वाढत आहे. राज्यातील इतिहास पाहता मुंबई (mumbai) आणि मालेगाव (malegaon) या ठिकाणी करोनाचं हॉटस्पॉट (hotspot) असल्याचे पाहायला मिळाले होते. विलक्षण पद्धतीने करोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची (Department of Health) चिंता वाढली होती. पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठीच खबरदारीचा उपाय योजना राबविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

90 च्या वर करोना बाधित रुग्ण जिल्हयात करोनाची सद्यस्थिती पाहता 90 च्या वर करोना बाधित रुग्ण असल्याने आणि बहुतांश करोना चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून औषधांचा साठा, करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या, लसीकरण आणि बेडची व्यवस्था याबाबतचा आढावा डॉ. भारती पवार यांनी घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या