ठाकरे गटाच्या खासदाराला जीवे मारण्याची धमकी

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देण्यात आली होती. यावेळी गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत धमकी देणाऱ्याला अटक (Arrested) केली.

यानंतर आता ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अगोदर एक वर्षापूर्वी खासदार जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच खासदार जाधव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी (Police) संशयिताचा तपास सुरु केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com