अंनिसचे श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी

अंनिसचे श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई | Mumbai

धीरेंद्र महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांचा संघर्ष पेटला असताना, श्याम मानव (Shyam Manav) यांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे...

या धमकीनंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली “तुमचा दाभोलकर करु” अशा शब्दात त्यांना धमकी देण्यात आली आहे. श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर हा धमकीचा फोन आला. त्याबरोबरच “तुम्हाला जीवे मारू” असा संदेशही पाठवण्यात आला आहे. मानव यांनी धीरेंद्र महाराज (Dhirendra Maharaj) यांना आव्हान दिल्यानंतर ही धमकी मिळाल्यामुळे याकडे गांभीर्याने बघितले जात आहे. 

या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून आता महाराष्ट्र स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे दोन तसेच दोन शस्त्रधारी जवान आणि तीन पोलीस त्यांच्या सुरक्षेत असणार आहेत.

अंनिसच्या श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज उर्फ बागेश्वर बाबांना दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. ते सिद्ध केल्यास ३० लाखांचं बक्षीस देण्याची घोषणाही श्याम मानव यांनी केली होती. धीरेंद्र शास्त्री 'दिव्य दरबार' भरवतात. पण यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

धीरेंद्र महाराज यांनी नागपूरात यावं, नागपुरातील अशा पाच लोकांना आम्ही निवडू जे तटस्थ आहेत, यात निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश असेल. महाराजांनी या माणसांची नावं, वय, वडिलांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर सांगायचा, असं आव्हान श्याम मानव यांनी दिलं होतं. तसंच धीरेंद्र महाराज यांना दोन संधी देऊ यात त्यांनी ९० टक्के माहिती बरोबर सांगितली तरी महाराजांच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागेल, तसंच हजारो बाबा, मांत्रिक आणि ज्योषितांचं भांडाफोड करणारी गेली ४० वर्ष सुरु असलेली आमची संस्था बंद करु असंही श्याम मानव यांनी म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com