तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

बागलाण तालुक्यातील ( Baglan Taluka ) तिळवण गावाजवळील वाडी चौल्हेर तलावात (Choulher Lake) पोहण्यासाठी मित्रांबरोबर गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला. २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सटाणा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना व पट्टीच्या पोहणा-यांना मृत देह काढण्यात यश आले. मुलाचा मृतदेह पाहुन आईने एकच हंबरडा फोडला आणि तलावात उडी घेतली.

तिळवण नजिकच्या वाडी चौल्हेर आदिवासी वस्तीवरील कौतीक सोनवणे हा २८ वर्षीय तरूण जवळच असलेल्या तलावात आपल्या मित्रांसह पोहण्यासाठी गेला असता मित्र सुखरूप तलावाबाहेर बचावलेत मात्र कौतिक तलावातील गाळात फसल्यामुळे तो पाण्याबाहेर पडू शकला नाही ही बातमी परिसरात समजताच बचाव कार्य सुरू झाले मात्र अंधारामुळे अडचणी आल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले.

सटाणा अग्निशमन दल व सटाणा पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी कौतिक याचे कपडे व चप्पल तलावाच्या बाजूला मिळून आले. आग्निशमन दल व पट्टीच्या पोहणा-यांच्या अथक प्रयत्नांनी २४ तासानंतर कौतीकचा मृत देह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी मुलाचा मृत देह बघुन आईने एकच टाहो फोडला.

मुलाच्या मृत्युचे दुःख न पचवू शकणा-या आईने तलावात उडी घेतली यावेळी सटाणा अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उडी घेऊन आईला सुखरुप तलावाबाहेर काढले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी सटाणा ग्रामीण रूग्णालयात मृत देह आणण्यात आला कौतिक बरोबर पोहायला गेलेल्या मित्रांची नावे भिती पोटी पुढे आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com