Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकारखान्याच्या छतावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू

कारखान्याच्या छतावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू

इगपुरी | जाकीर शेख Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) वाडीवऱ्हे ( Vadivarhe ) जवळ असणाऱ्या फॅब कंपनीत ( Fab Company ) झालेल्या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे( ( Death of Two Workers ) ). आज रात्री पावणेआठ वाजता झालेल्या ह्या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

- Advertisement -

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे अपघातस्थळी दाखल झाले. मात्र संबंधित कामगार जागीच मृत असल्याने उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ह्या घटनेमुळे कामगारांची सुरक्षितता धोक्यात आला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ असणाऱ्या फॅब कंपनीत पत्र्याचे काम करणारे कामगार मोहम्मद सानु खान वय 28, मोहम्मद अनास वय 21 मूळ राहणार उत्तरप्रदेश हे दोघे काम करत होते. आज रात्री पावणेआठच्या दरम्यान अचानक पत्रा तुटल्याने ते खाली पडले. जास्त उंचावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत माहिती समजताच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे (Vadivarhe Police Station ) पोलीस निरीक्षक अनिल पवार आणि सहकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन तपासकार्य सुरु केले आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे अपघातस्थळी दाखल झाले. मात्र संबंधित कामगार जागीच मृत असल्याने उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ह्या घटनेमुळे कामगार वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या