वादळी पावसात भिंत कोसळल्याने वृद्धाचा मृत्यू

वादळी पावसात भिंत कोसळल्याने वृद्धाचा मृत्यू

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

वादळी पावसाने ( Rain )सिन्नर शिर्डी महामार्गालगत ( Sinnar- Shirdi Highway ) गवळी मळा ( Gavli Farm )परिसरात जनावरांच्या गोठ्यासाठी केलेल्या शेडची भिंत अंगावर कोसळून एक वृध्दाचा मृत्यू झाला (Death of Old Man due to wall collapsed). नारायण हरिभाऊ गवळी (62) असे मृताचे नाव आहे.

आज (दि. 1) शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सायंकाळनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने बळीराजा सुखावला.

मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसाने शहराजवळील गवळी मळ्यात नारायण गवळी हे गोऱ्हा सोडून अन्यत्र बांधण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वादळी वाऱ्याने शेडची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यात ते गंभीर जखमी झाले. गवळी कुटूंबीयांनी तत्काळ त्यांना उपचारांसाठी खासगी दवाखान्या दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विशाल गवळी यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली. सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com