
गोलशी | वार्ताहर | Golshi
दिंडोरी तालुक्यातील नळवाड पाडा येथे आजोबा व नातवावर घराचे स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. यात आजोबा व नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील नळवाड पाडा येथे गुलाब वामन खरे व त्यांचे कुटंब वास्त्यव्यास आहे. काल रात्री11:30 वाजेच्या सुमारास पावसाने अचानक त्यांच्या राहत्या घराचे छत कोसळले.
यात गुलाब वामन खरे (60) व नातू निशांत विशाल खरे (3.5) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, ग्रामसेवक, दिंडोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ननाशी येथील मंडळ अधिकारी यांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विठाबाई वामन खरे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.