Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याधरणात बुडून युवकाचा मृत्यू

धरणात बुडून युवकाचा मृत्यू

घोटी । जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) काळुस्ते निरपन ( kaluste Nirpan ) येथील रहिवासी भाम धरणाच्या ( Bham Dam ) नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या इसमाचा बुडुन मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

- Advertisement -

काळुस्ते येथील शरद मंगळु पोकळे, वय ३८ वर्ष हा भाम धरणाच्या सांडव्याच्या भिंती लगत आंघोळीसाठी पाण्यात उतरला होता. आंघोळी पुर्वी शरद पोकळे याने जवळच पाणी नसलेल्या ठिकाणी आपले आंगवरील कपडे काढून ठेवले व पाण्यात आंघोळीसाठी गेला होता. मात्र दोन तास झाले तरी बाहेर आला नाही म्हणुन त्याची पत्नी वनिता शरद पोकळे व ग्रामस्थांनी शोधाशोध केली तरी मृतदेह आडळला नाही.

अखेर मच्छीमार व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाच तासाच्या प्रयत्नाने या इसमाला मृत अवस्थेमध्ये बाहेर काढण्यात यश आले. शरद पोकळे हा आई वडील पत्नी मुलासह सदरचां एकत्रित कुटुंबात राहत होता. तो नेमका कसा पाण्यात बुडाला हे समजू शकले नाही. सदरया मृतदेह शवविच्छेदनसाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या