Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यावीज पडून पती-पत्नीचा मृत्यू

वीज पडून पती-पत्नीचा मृत्यू

घोटी। वार्ताहर Ghoti

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) पिंपळगाव घाडगा ( Pimpalgaon Ghadga ) येथे आज बेमोसमी पावसाने ( Untimely Rain )हजेरी लावली दूपारी वादळी वार्‍यासह विजेच्या गडगडासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे झाडाखाली उभा असलेल्या व्यक्तींवर वीज कोसळली. यात पती-पत्नीचा मृत्यू झाला(Death of a Couple due to lightning ). तर त्यात त्यांच्या दोन चिमुरड्या गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घटडली. यात एक युवकही जखमी झाला असून, जखमींवर एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नीचे नाव दशरथ दामू लोते, वय 35, सुनीता दशरथ लोते, वय 30 असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालुंजेवाडी ता. इगतपुरी येथील लोते हे दाम्पत्य आपल्या मुलांसह गिर्‍हेवाडी येथील एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते. वादळी पाऊस आल्याने पिंपळगाव घाडगा येथील गोपाळ किसन देवगिरे यांच्या शेतातल्या आंब्याच्या झाडाजवळ त्यांनी आसरा घेतला.

मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर वीज पडल्याने ते दोघेही जागीच ठार झाले. सोबत असलेल्या मुली तेजस्विनी लोते वय 7, सोनाली लोते वय 5 ह्या दोघीं या घटनेत गंभीर जखमी झाल्या. तसेच गिर्‍हेवाडी येथील आणखी एक युवक बाळू चंदर गिर्‍हे, वय 20 हे तिघे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी वाडीव-हे येथील सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार, पोलीस हवालदार विलास धारणकर, भाऊसाहेब भगत, निलेश मराठे, तलाठी एस. एन. रोकडे यांनी भेट देऊन कार्यवाही केली. या घटनेनंतर इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या