पतंग उडवताना तोल जावून विहिरीत पडलेल्या बालकाचा मृत्यू

पतंग उडवताना तोल जावून विहिरीत पडलेल्या बालकाचा मृत्यू

धरणगाव :Dharangaon

 तालुक्यातील हिंगोणा येथे पतंग (kite) उडवणार्‍या दहा वर्षीय बालकाचा (child) विहिरीत तोल जावून पडल्याने मृत्यू (Death) झाला. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी दोन वाजता घडली. अक्षय संजय महाजन (10, रा.कळमसरे, ता.अमळनेर ह.मु. हिंगोणे ता. धरणगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. या संक्रांती सणालाच घडलेल्या दुर्घटनेमुळे हिंगोणे गावात शोककळा पसरली आहे.

हिंगोण्यात मकरसंक्रांती सणानिमित्त संजय महाजन (माळी) यांचा पाचव्या इयत्तेत शिक्षण घेणारा अक्षय (10) हादेखील पतंग उडवत होता मात्र याप्रसंगी त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडल्याने त्याची प्राणज्योत मालवली. गावात ही वार्ता कळताच ग्रामस्थांनी धाव घेत अक्षयला बाहेर काढले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com