रस्त्याचे वळण ओढावले मरण; पत्नीकडून रात्रभर प्रेताची राखण

रस्त्याचे वळण ओढावले मरण; पत्नीकडून रात्रभर प्रेताची राखण

दहिवड । मनोज वैद्य Dahivad

देवळा तालुक्यातील(Deola Taluka ) उमराणे ते मनमाड रस्त्यावर असलेल्या घाटाजवळच्या वळणावरून पिंपळगाव ता.येवला येथील एक आदिवासी कुंटूब कुभार्डै येथे यात्रोत्सवासाठी दि 6 मार्च रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास आपल्या नातेवाईकांकडे जात होते.

दरम्यान त्या दिवशी पावसाची रिपरीप व विजेचा तांडव सुरु होता. गिरणारे गावाजवळील उमराणा ते मनमाड रसत्यावरच्या वळणावरती असतानां समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने अपर लाईट मारले व मोटरसायकल स्वार चे डोळे दिपुन गाडीवरचे नियत्रण सूटले आणि दुचाकी रसत्याच्या बाजुला असलेल्या खड्यात फेकली गेली.त्या ठिकाणी त्या इसामाला तिथे पडलेल्या दगडाचा मार बसला व जागेवरच त्याचा मृत्य झाला.असे स्थानिकांच्या दिलेल्या माहितीवरुन समजत आहे.

मयताचे नाव लाहनू मोरे वय वर्ष ४२ असून मोटरसायकल क्रंमाक MH, 03 AC 3317 या दुचाकीने येवला तालुक्यातील पिपंळगाव येथुन कुभार्डै येथे पत्नी सोबत जात होते. या अपघातात त्यांची पत्नीं सत्याबाई मोरे वय वर्ष ४० यांनाही जोराचा मार लागला आहे. त्या जखमी अवस्थेतच स्वताच्या पतीच्याप्रेताला रात्रभर राखत बसल्या.ही घटना रात्रीच्या सुमारास झाल्यामुळे ह्या रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने कुणाच्या लक्षात आली नाही.

सकाळी गिरणारे येथिल पोलीस पाटील अनिल वाघ यांना कळताच गावातील सर्व ग्रामस्थानी सदर ठिकाणी धाव घेतली. परिस्थितीची पहाणी केली असता जखमी झालेल्या सत्याबाई यांना लगेच उमराणे ग्रामिण रुगणालयाची अँबुलन्स बोलवुन तत्काळ पुढील प्रथोमपचारासाठी दाखल केले व देवळा पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती दिली.

सदर अपघाताची पुढील चौकशी देवळा पोलीस करत आहेत. अपघात स्थळी गिरणारे येथिल पोलीस पाटिल अनिल वाघ, ज्ञानेश्वर खैरणार, बाजीराव महाले,भगवान गांगुर्डै ,राजाराम गांगुर्डै बाजीराव गांगुर्डै अदी ग्रामस्थानी तत्काळ मदत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com