विदर्भ एक्स्प्रेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

कसारा रेल्वे स्थानकावरील घटना
File Photo
File Photo

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गोंदियाहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलेचा मृतदेह आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही रेल्वे कसारा रेल्वे स्थानकावर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे थांबवण्यात आली. यावेळी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे....

तांत्रिक बिघाड झाल्यानंतर कसारा रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली असता एक महिला प्रवासी मयत झाल्याचे आढळून आले आहे. मयत महिला ट्रेनमध्ये एकटीच प्रवास करत होती अशी माहिती मिळत आहे.

File Photo
नाशकातील 'त्या' खुनाचा पोलिसांकडून उलगडा

एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांना बलिया एक्स्प्रेसने कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. महिलेचा मृतदेह कसारा रूग्णालयात हलवण्यात आला असून महिलेच्या मृत्यूबाबत दादर येथे असलेल्या नातेवाईकांना कळवण्यात आल्याचे समजते.

File Photo
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com